मुख्य पृष्ठ

।। श्री स्वामी समर्थ ।।

परिचय


श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे निर्माते प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थ महाराजच आहेत. श्री स्वामी समर्थ व श्रीपाद श्रीवल्लभ यांनी ब्र.प.पू.पिठले महाराज यांच्याकडून अनेक दीर्घ उपासना करवून त्यांचे जीवन श्री स्वामी समर्थमय असे घडविले.ब्र.प.पू.पिठले महाराजांकडून एकमेव शिष्य सदगुरू प.पू.मोरेदादा यांना सर्वार्थाने परिपूर्ण असे या सेवा मार्गाच्या प्रत्यक्ष संस्थापनार्थ तयार करण्यासाठी ब्र.प.पू.पिठले महाराजांनी दीर्घ काल हिमालयात खडतर तपश्चर्या केली. प्रदीर्घ काल श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर तीर्थावर व नाशिक येथे विविध उपासना तपश्चर्या करून सदगुरू प.पू.मोरे दादांसारखा एकमेव शिष्य सेवामार्गासाठी घडविला यावरून सदगुरू प.पू.मोरे दादांची आध्यात्म क्षेत्रातील परमोच्च स्थान व पात्रता सिद्ध होते आणि अनायासे सध्याचे त्यांचे वारसदार गुरूमाऊली.प.पू. आण्णासाहेब यांचीही आध्यात्म क्षेत्रातील उच्चतम पात्रता व उज्ज्वल पूर्वसुकृत सिद्ध होते. तेव्हा सेवेकर्‍यांनी या सेवा मार्गात पूर्ण क्रियाशील व श्रद्धेने दृढ राहून भगवान श्री स्वामी समर्थ व गुरुमाऊली प.पू.आण्णासाहेब यांचे प्रेम, कृपाप्राप्तीसाठी प्रयत्नरत राहून आपले व आपल्या कुटुंबाचे ही ऐहिक व परमार्थिकदृष्टया कल्याण करून घ्यावे.
अध्यात्म मार्ग हा इहलौकिकदृष्टया जीवनाचा एकमेव अंतिम असा खर्‍या सुखशांतीचा व कल्याणाचा मार्ग असला तरी या कलियुगात भोळ्याभाबड्या सुशिक्षित असो वा अशिक्षित अशा जनतेचा ईश्वरीय श्रद्धेचा गैरलाभ घेवून त्यांची फसवणूक करणारे अगर चुकीच्या मार्गाने नेणारे अंदाजे नव्वद टक्केच्या वर मार्ग, पंथ अस्तित्वात आहेत. यात मतलबी लोकांचाच भरणा जास्त झाला आहेत. काही आपल्या अहंकाराचे पोषर करण्यातच धन्यता मानणारे आहेत. खरे म्हणजे अध्यात्मिक उपासनेचे मूळ तत्व अंहकार नाशासाठी असते. म्हणजे कर्म करीत राहणे व फलिताचे सर्वस्व ईश्वरावर सोपवून जीवन जगण्याचा हा मार्ग आहे. अनेक जण सिद्धी प्राप्त करून तथाकथित संतमहात्मे हे आपल्या 'स्व' चाच विस्तार व पोषण करण्यात मग्न आहेत. यामुळे अशांच्या सान्निध्यातील जनता पण चुकीच्या मार्गदर्शनाने आध्यात्माच्या सतमार्गाला वंचित राहते. तेव्हा आध्यात्माचा सत्‌मार्ग सांगण्यासाठीच हा एक ईश्वरी प्रेरणेने केलेल्या प्रयत्न आहे. या सेवा मार्गातील अनुभव असा आहे की, व्यक्ती आपल्या गंभीर समस्येवर अनेक ठिकाणी मांत्रिक, गंडदोरे, पुरोहिताकडून केलेल्या शांत्या, इतर देव-देव करुन निराश व असहाय्य झाल्यावरच या सेवा मार्गातील मार्गदर्शनासाठी निदान आपल्या समस्येचे निवारण होईल काय? हे पाहण्यासाठी येते आणि आश्चर्य असे की त्या व्यक्तिने श्रद्धेने महाराजांची सेवा सुरु करताच अगदी थोड्या अवधीत त्यास मानसिक स्वास्थ व आत्मविश्वास लाभून त्याच्या समस्या निवारण्याचे मार्गही त्याला यथाकाल उपलब्ध होतात व गृहशांती लाभते. या सेवा मार्गात मार्गदर्शन सेवा विनामूल्य असते व अशा मार्गदर्शनाची सोय सध्या महाराष््रट-ाच्या प्रत्येक जिल्ह्यात आहे. दिंडोरी प्रधान सेवा केंद्रात व गुरूपीठ त्र्यंबकेश्वरी तर रोजच मार्गदर्शनाची सोय आहे. या सेवामार्गात जनतेने यायच्या ऐवजी हा सेवा मार्गच आता तालुका, जिल्हा सेवा केंद्रातून ग्रामीण अंतर्भागात वाटचाल करत आहे. या सेवा मार्गात गुरुदिक्षा पद्धत नाही.
सरळ जगद्गुरु भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांनाच गुरुपद दिलेले आहे व प्रत्येक गुरुपौर्णिमेला प्रत्येक सेवेकरी श्री स्वामी समर्थांना अभिषेक व पूजा करून प्रार्थना करून त्यांना गुरुस्थानी मानून वचनबद्ध राहतो. त्यामुळे या मार्गात बुवाबाजीला बिलकुल थाराच नाही व कुणा भाविकाच्या फसवणुकीची सुतराम शक्यता नाही. 'श्री स्वामी समर्थ' हा मंत्र गोपनीय नाही. यामुळे या सेवा मार्गाची शुद्धता व निर्मलता साक्षात गंगामाईसारखीच आहे. उपासना व कर्मकांडासंबंधी अधिकार पुरुषांबरोबर महिलांनाही देवून या सेवा मार्गाने सकल महिला वर्गाला सन्मानित केले आहे. खरे म्हणजे आजवरच्या ८०० वर्षाच्या परधर्मियांच्या जोखडाखाली, अनेक धार्मिक अत्याचाराखाली संपूर्ण भारतीय संस्कृती भरडली जात असतांना धर्माचे खर्‍या अर्थाने सरंक्षण महिलांनीच केले आहे. धर्मपंडितांनी केवळ धर्मशास्त्रच जतन करून भांडारपालाचे काम केले आहे. या सेवा मार्गात स्वधर्मीयांबरोबर परधर्मीय (मुस्लिम, ख्रिश्चन इ.) सामावून घेतले आहेत. यात लोकांना त्यांच्या धर्माचा विचार करून कार्यक्रम दिला जातो. त्यांना देखील अपेक्षित अनुभव आलेले आहेत. या सेवा मार्गात व्यक्ताइच्या जीवनातील सर्व प्रकारच्या अधिभौतिक, अधिदैविक, बाधा, अडचणी इ. निवारणार्थ कार्यक्रम दिले जातात.
कार्यक्रम देते वेळी मानसिक, शारिरिक, आर्थिक व शैक्षणिक इ. सर्व परिस्थितीचा विचार केला जातो. या सेवा मार्गात माता-पित्यांची सेवा, ज्येष््रठांना मान व आदर, कुलदेवतेची सेवा, परस्त्री मातेसमान, मांसाहार वर्ज्य, नियमित पितृकर्म, देव्हार्‍यातील नित्य नैमित्तिक पूजा, मासिक पाळीचे अशुचिता पालन, उपासनेचे अखंडत्व इ. यमनियमांचे काटेकोर पालन करावे लागते. समंध बाधा, ब्रम्हराक्षस बाधा, भूत बाधा, पिशाच्च बाधा, कनिष््रठ देवतांची बाधा, जारण-मारण, उच्चाटन निवारण इ. प्रकारांवरील तोडगे, उतारे, नाडीवरील मंत्र, साधे-सोपे अनुष््रठान, हवन, घरच्या घरी करता येतील असे कार्यक्रम दिले जातात. प्रखर बाधेवर तीर्थावर करावयाचे कार्यक्रम दिले जातात. या सेवा मार्गात 'जो करील सेवा, तो खाईल मेवा' हे तत्व आहे.
या सेवा मार्गाचे सेवा केंद्रे मंदिरे नसून संस्कार केंद्रे आहेत. बालसंस्काराला या सेवा मार्गात अतिमहत्व दिले जाते. एवढेच नव्हे तर बालसंस्कार हे सेवा मार्गाचे एक अंतिम ध्येेय होय. कारण, व्यक्तीवर आध्यात्मिक संस्कार करायचे झाले तर ते बालवयातच होवू शकतात. ओल्या मातीतूनचे मूर्ती घडविली जाते. मोठ्या व्यक्तीवर संस्कार करणे ही अवघड, कष््रटाची व विलंबदायक अशी बाब आहे. बालवयात केलेल्या संस्कारामुळे त्या बालकांचे भावी जीवनच पूर्णपणे बदलून जाते व बालक भावी जीवनात आशादायी, आत्मविश्वासू, अभय वृत्तीचे, परोपकारी, मातृ-पितृ भक्त, सहनशील, संयमी, उद्योगी, कुलभूषण, समाजभूषण, दृढ श्रद्धवान, जीवनात नित्य यशस्वी अशा व्यक्तिमत्वाचे होते.जो जीवनभर नियमित भगवान परब्रम्ह श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतो व श्री स्वामी समर्थ हे ज्याचे दैवत आहे त्यांच्या अंतकाली भगवान परब्रम्ह श्री स्वामी समर्थच परलोकी जाण्याचा मार्गदर्शनासाठी येतात. हे अनुभूत असे सत्य आहे.

२ टिप्पण्या: