पृष्ठे

पृष्ठे

दिंडोरी प्रणित उत्सव

दिंडोरी प्रणित उत्सव

श्री स्वामी समर्थ जयंती

(चैत्र शुक्ल २) या दिवशी भगवान श्री गुरुदत्तात्रेयांचा आगळावेगळा आविष्कार आग्य्राजवळील छेले या गावी भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या स्वरुपात भूतलावर अवतरला आणि आपल्या सर्वांचे महद्भाग्याने आजही हा आविष्कार अविरतपणे कार्यरत आहे. याची जाणीव आपल्या प्रत्येक सेवेकर्‍याला होण्याकरीता हा उत्सव आपल्या सर्व श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रावर करावयाचा आहे. या दिवशी आपल्याला शिकविण्यात आलेल्या सर्व सेवांची उजळणी व नवीन सेवेकर्‍यांना आपल्या मार्गातील साधनेचे मंत्र, प्रयोग, उतारे, तोडगे यांचे प्रात्यक्षिक दाखविण्याकरीता आपल्या केंद्रात मांदियाळी (श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे मागील पानावर दिलेल्या पद्धतीनुसार) करावी.

श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी सप्ताह

(चैत्र कृष्ण ७ ते चैत्र कृष्ण १३) श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र, दिंडोरी दरबार येथे १९४८ सालापासून तेजोनिधी सदगुरु प.पू. पिठले महाराज व सदगुरु प.पू. मोरेदादा यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या माध्यमातून वाटचालीस सुरुवात केली. सदगुरु प.पू. पिठले महाराज व सद्गुरु प.पू. मोरेदादा परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांशी एकरुप झाल्यावर पुढील कार्याची वाटचाल गुरुमाऊली प.पू. आण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शना खाली चालू आहे. केंद्राची संख्या व व्याप्ती सागरासारखी वाढत आहे. सध्याच्या आधुनिक विज्ञान युगाची २१ व्या शतकातील वाटचाल तर सर्वसामान्य जनतेला ग्रासून टाकणार्‍या भूकंप, अतिवृष्टी, प्लेग, परचक्र आक्रमणाची भीती या सारख्या संकटांची संभाव्यता लक्षात घेवून आधुनिकतेशी वैर न धरता सर्वसामान्य जनांना मानसिक धैर्य, मनःशांती, जीवनात येणार्‍या समस्यांचे निराकरण (निर्मूलन), सुख, समाधान, आरोग्य याकरीता सदगुरु प.पू. पिठले महाराज व त्यांच्या कृपाशिर्वादातून सद्गुरु प.पू. मोरेदादांनी प्रत्येक सेवाकेंद्रात करावयाच्या सप्ताहांची रचना केली. म्हणूनच प्रत्येक सेवाकेंद्राने दत्तजयंतीस व स्वामी पुण्यतिथिस अखंड नाम जप यज्ञ सप्ताह करणे योग्य ठरेल.

सदगुरु प.पू. मोरेदादा पुण्यतिथी

(वैशाख शुक्ल १२) सर्व श्री स्वामी समर्थ सेवेकरी बंधूभगिनींना श्री स्वामी समर्थ महाराजांची ओळख तेजोनिधी सदगुरु प.पू. मोरेदादांनी करुन दिली, आपल्या सर्वांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला. ते आपल्या सर्वांचे आध्यात्मिक गुरु आहेत याची सर्वांनी जाणीव ठेवून त्यांचे हे तेजोमय कार्य सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याची सेवा हीच त्यांना खरी आदरांजली होईल. सदगुरु प.पू. मोरेदादांच्या पुण्यतिथीच्या दिवशी आपल्या परिसरातील सर्व वर्तमानपत्रे तसेच इतर प्रसारमाध्यमातून आपण सदगुरु प.पू. मोरेदादांची ओळख तमाम महाराष्ट्राला नव्हे तर या देशाला करुन द्यावी. केंद्रात मांदियाळी साजरी करावी. तसेच व्हिडीयो कॅसेटद्वारे प.पू. गुरुमाऊलींचे हितगुज घडवून आणावे.

गुरुपौर्णिमा

(आषाढ शुक्ल १५) आपणा प्रत्येकास हे माहित आहे की, या विश्वात जन्म घेणार्‍याला परमेश्वराचे सानिध्य लाभण्यासाठी श्री गुरूंचे चरण धरावे लागतात. आपण सर्व सेवेकरी भाग्यवान आहोत की, आपले गुरूपद साक्षात्‌ परब्रह्माने घेतलेले आहे. अशा या परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचे पूजन करून आपल्या भावी आयुष्यात मार्गदर्शन करण्याची विनंती त्यांना करण्याचा हा दिवस आपण आपल्या सेवा केंद्रात किंवा घरी परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची षोडशोपचारे पूजा यज्ञविधी ग्रंथाप्रमाणे करून करावी.

श्रीपाद श्रीवल्लभ जयंती

(भाद्रपद शुक्ल ४) या शुभदिनी गोदावरी काठी पीठापूर येथे श्री स्वामी समर्थ महाराजांनी श्रीपादश्रीवल्लभ हा अवतार धारण केला. या दिवशी आपल्या केंद्रात जयंती सोहळा साजरा करावयाचा आहे. या वेळी प्रत्येक सेवेकर्‍याने हजर राहणे अत्यावश्यक कारण आपल्या केंद्रात सेवा करावयाची पद्धत, नित्यनियम, आरत्या इत्यादी गोष्टी सद्गुरु प.पू. पिठले महाराजांनी त्यांचे सद्गुरु श्रीपाद श्रीवल्लभ यांच्याकडून सुरु केली व तीच आजतायगत चालू आहे. भाद्रपद शुध्द चतुर्थी अथवा गणेश चतुर्थी याच दिवशी हा कार्यक्रम असतो.

अनंत चतुर्दशी

(भाद्रपद शुक्ल १४) पुष्कळ ठिकाणी गणपती विसर्जन अनंत चतुर्दशीस करतात. त्याचप्रमाणे अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान महाविष्णू पृथ्वीवर सहपरिवार येतात. त्यांची सेवा सामूहिक पध्दतीने केंद्रात ६.३० च्या आरतीला उत्सव स्वरूपात केली जाते, यात सत्यनारायण पूजा केली जाते. विष्णु सहस्त्र नामावली वाचून १००१ तुलसीपत्र सामूहिकरित्या वाहून अनंत चतुर्दशी साजरी केली जाते.

वेदमाता गायत्री ऊत्सव

(आश्विन शुध्द ९) श्री गायत्री माता व गायत्री मंत्र हे आपल्या आर्य धर्मांचे मूळ अधिष्ठान असून आपल्या मार्गांची मूळ देवता आहे. त्यांचा उत्सव वर्षातून फक्त एकदाच होतो, तो म्हणजे अश्विन शुध्द नवमी. ठिक सकाळी ८ ची आरती झाल्यानंतर प्रत्येक सेवेकर्‍याने १ माळ गायत्री मंत्र व ११ माळी श्री स्वामी समर्थ मंत्र जपावे.ठीक १०॥ ला एकूण ५ अन्नाचे नैवे करावे. प्रथम कुलदेवता, दुसरा नारायणाचा या क्रमाणे ५ वा गायत्री मातोश्रींचा असे नैवे मांडावे. सकाळच्या तीन व सायंकाळच्या दोन अशा आरत्या म्हणून सर्वांना प्रसाद ावा. गायत्री मातेसाठी शुध्द तूप, गुळाचा, गव्हाच्या पिठाचा प्रसाद करावा. सेवा : गायत्री सहस्त्रनाम, गायत्री मंत्र यांचे वाचन, पठन, हवन करावे.

कोजागरी पौर्णिमा

(आश्विन शुक्ल पौर्णिमा) हा उत्सव आश्विन शुध्द पौर्णिमा या दिवशी रात्री ठीक १२ ते १२.३९ या ३९ मिनिटात करावयाचा असतो. भगवान इंद्र, लक्ष्मी, चंद्र, कुबेर यांची वर्षातून सेवा करण्याची हीच एकमेव वेळ असते. शक्यतो हा उत्सव प्रत्येक सेवेकर्‍याने आपल्या घरीच करावा, पण शक्य नसेल त्यांनी केंद्रात केला तरी चालेल.

श्री गुरुद्वादशी

(आश्विन व १२) हा दिवस म्हणजे भगवान श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या निजधाम गमनाचा, नवा अवतार धारण करण्याचा दिवस आहे. या दिवशी सकाळी ८.०० चे आरतीपूर्वी श्रीपाद श्रीवल्लभांचा फोटो केंद्रात श्री स्वामी समर्थ महाराज व दत्त महाराजांच्या फोटोच्या मध्यभागी ठेवावा. आरती झाल्यावर प्रत्येकाने ११ माळी श्री स्वामी समर्थ जप करावा. त्यानंतर श्री गुरूचरित्र ग्रंथाचा ९ वा अध्याय एका सेवेकर्‍याने मोठ्याने वाचावा, इतरांनी त्याचे श्रवण करावे. १०.३० चा आरतीला अन्नाचे ६ नैवे करावे. श्रीपाद श्रीवल्लभांचे आवडीचे पदार्थ नैवोत करावेत.

श्रीदत्त जयंती सप्ताह

(मार्गशीर्ष शु. १५) या दिवशी सर्वत्र दत्त जयंती उत्सव केला जातो. श्री दत्त महाराज हेच आपल्या मार्गाचे मूळ असल्याने हा कार्यक्रम सामुदायिकपणे व खूप भक्तीभावाने करावयाचा असतो. श्री दत्त जयंती निमित्त सर्व सेवेकर्‍यांनी उपोषण करावयाचे असते व उपवास दुसर्‍या दिवशी म्हणजे प्रतिपदेला १०॥ चे आरतीनंतर सोडावयाचा हे प्रथम लक्षात ठेवावे.

श्री गुरु प्रतिपदा

श्री नृसिंह सरस्वती महाराज शैलगमन (माघ कृष्ण १) इ. स. १५२८ च्या कालखंडात कारंजा (विदर्भ) येथे श्री गुरू दत्तात्रेयांनी एक आगळावेगळा अवतार घेतला. भगवान श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी १०० वर्षे संपूर्ण भारत भ्रमण व ५० वर्षे श्री क्षेत्र गाणगापूर येथे वास्तव्य करून एका महान तीर्थक्षेत्राची निर्मिती केली. निजगमनास जातांना स्वतःच्या निर्गुण पादुका श्री क्षेत्र गाणगापूर येथे सेवेकरिता ठेवल्या. या काळापासून परकीय सत्तांचा र्‍हास व हिंदू राजसत्तेचा उदय झाला. भगवंताचा हा अवतार १५० वर्षे कार्यरत होता. त्या कार्याची झलक आपल्याला वेदाइतकेच महत्व असलेल्या श्री गुरूचरित्र ग्रंथात बघावयास मिळते. माघ व १ ला श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी श्री शैल्य गमन केले व गुप्तरूपाने कार्य चालू ठेवले.

महाशिवरात्र

(माघ कृष्ण १४) सेवाकेंद्रात श्री दत्त महाराजांच्या शेजारी भगवान श्री शंकराचा फोटो सकाळी ८ च्या आरतीपूर्वी ठेवावा. सकाळी ८ च्या आरतीनंतर श्री भगवान शंकराच्या पिंडीची यज्ञविधी ग्रंथात दिल्याप्रमाणे षोडशोपचार पूजा करावी.

श्रीसत्यनारायण महापुजा

पौणिमेस करावयाची श्रीसत्यनारायणपूजा पूजा साहित्य : एक चौरंग, एक पाट, चौरंगाभोवती आंब्याचे चार डगळे लावावेत. चौरंगावर शुभ्र वस्त्र टाकावे. त्यावर मध्यभागी थोडे गहु टाकावे. त्यावर एक कलश त्यात पाणी भरुन ठेवावा. त्यात पाच विड्याची पाने ठेवावीत. त्यावर ताम्हण तांदुळाने भरुन त्यात बाळकृष्णाची मुर्ती ठेवावी. कलशासमोर चौरंगावरती तीन सुपार्‍या विड्याचे पानावर मांडाव्यात. (पहिली सुपारी गणपतीची, दुसरी कुलदेवतेची व तिसरी वरुण देवतेची) याप्रमाणे मांडामांड करुन सर्वांची पंचोपचार पूजा करावी. यानंतर बाळकृष्णाचीही पंचोपचार पूजा करावी व यशाशक्ती प्रसाद करुन त्याचा नैवे दाखवून श्रीसत्यनारायणाची पोथी वाचावी.
पोथी वाचून झाल्यानंतर अन्नाचा नैवे दाखवून आरती करुन कुटुंबात सर्वांना प्रसाद वाटावा. (बाहेरील कोणत्याही व्यक्तिस प्रसाद देऊ नये.) दर पौर्णिमेला सायंकाळी (प्रदोषकाळी) वरीलप्रमाणे श्रीसत्यनारायणाचे व्रत करावे. यामुळे अखंड लक्ष्मी घरात वास करते.

शाकंभरी देवी नवरात्र

पौष शु. ८ ते पोर्णिमा शु. १५
भारतीय कृषि संकृतिशी निगडित शाकंभरी देवी नवरात्र पौष महिन्यात येते. शुद्ध अष्टमी ते पोर्णिमा या काळात नवरात्र साजरी करण्यात येते. नवरात्रीची पूजा (सेवा) विविध पद्धतीने करण्यात येते. शेवटच्या दिवशी पूरण-वरणाचा नैवद्य आणि शक्य तितक्या जास्तीत जास्त पालेभाज्यांचा नैवेद्य दाखवला जातो. भारतीय शेतकर्यानी आपल्या श्रमाना, कर्माला ईश्वरीय लिलेचा समारंभ बनवला आहे. या कारणास्तव ते श्रमही पुष्टि-दूष्टि दायक बनली आहे. अशा उत्साहात पार्वतीचे अन्नपूर्नेत रूपांतर जाले आहे. आकाशात सूर्य, तेज, वायु द्वारे अन्नपूर्नेचा नित्य पाक यज्ञ सुरु आहे. सहा रुतुच्या रुपाने देवी अन्नपूर्णा या पाक यज्ञाच्या प्रवरस सर्व सजिवाना देते. विश्वेश्वर रूद्र प्राणदाता आहे, त्याची अन्नपूर्णा शक्ति प्राणशोषक आहे. तर शेतकर्यानी मातीतील वसुमती, शस्य शामल, शाकंभरी, महालक्ष्मी बनली आहे म्हणून पौष शु. अष्टमी ते पौष. पोर्णिमा या काळात तिचा उत्सव, नवरात्र साजरे करतात. श्री दुर्गा सप्तशतीत वर्निल्या प्रमाणे महाकाली रूपा देवी "शाकंभरी" निलोप्तल, लोचना, नीलवर्णी आहे. तिच्या एका हातात शाकंभरी, अन्नपूर्णा, पार्वती मातेचे प्रतिक आहे. पार्वती मातेचे अन्नपूर्णा स्वरूपातील व्रत, शुभकारक, अभीष्टा करणारे, सौभाग्य वाढविनारे, धान्यवृधि करणारे व पावित्र्याचे प्रतिक आहे. म्हणून हा उत्सव निसर्गाचे, धरणीच, कृषिचे, अंबा मातेचे उपकार, कृतज्ञता व्यक्त करणारे आहे. आई भगवतीची विविध पधतीने सेवा करून पूजा, आर्चा केली जाते. स्त्रोत्र, मंत्र व श्री दुर्गा सप्तशती पाठाचे पठन केले जाते.

वाढदिवस कसा साजरा करावा

वाढदिवस कसा करावा
थोरा-मोठ्यांच्या जयंतीप्रमाणे प्रत्येकाने आपल्या कुटुंबातील लहान मुला-मुलींचे वाढदिवस साजरे करण्याची प्रथा तशी फार पुरातन आहे. हल्ली तर एक किंवा दोनच मुलांच्या कुटुंबात त्या मुलांवर दरवर्षी, त्यांच्या जन्मदिनी, वाढदिवसाचा संस्कार होण्याची फार आवश्यकता आहे. या मंगल दिवशी, दीर्घायुष्य लाभावे म्हणून श्री कुलदेवता स्मरण करून पुढील प्रमाणे संस्कार करावा. तरी शाकंभरी देवी नवरात्राच्या काळात सर्व सेवेकर्यानी जास्तीत जास्त आई भगवतीची सेवा करून आपले जीवन सुखकर व शांतिमय करावे.
  1. हिंदू पंचांग प्रमाणे साजरा करावा. (इंग्रजी तारखेनुसार नको.) कारण आपली सर्व देव दैवते, साधू संत, ऋषि मुनी यांचे जन्मोत्सव तसेच आपल्या मृत आई-वडिलांचे श्राध्द पक्ष ही सर्व तिथी प्रमाणे करायची असतात, म्हणून वाढदिवसही तिथी प्रमाणे करावा.
  2. वाढदिवस आपल्या कुलदेवतेच्या साक्षीने व आशिर्वादाने साजरा करावा. ज्यांचा वाढदिवस असेल त्याला त्या दिवशी नवे वस्त्र घ्यावे (हे वस्त्र आपल्या पैशाने घ्यावे). त्या व्यक्तीला अभ्यंग व सचैल स्नान घालावे.
    अभ्यंग: सुवासिक तेल लावून.
    सचैल: ज्या वस्त्रांवर स्नान करायचे ती वस्त्रे नंतर दान ावी. (स्वतः वापरू नये.), त्याला नवे कपडे घालून रंगीत पाटावर बसवावे. औक्षण करून ओवाळावे नंतर
  3. दोन्ही हातात तांदूळ (अक्षता) घेऊन श्री रामरक्षेतील पहिले ९ श्लोक (या ९ श्लोकात डोक्यापासून पायापर्यंतच्या प्रत्येक अवयवांचा उल्लेख आहे.) म्हणून त्या-त्या अवयवांवर थोडे थोडे तांदूळ टाकत जावे. समोर श्री कुलदेवतेचा फोटो ठेवावा. फोटोला नैवे दाखवावा आणि विनंती करावी की, या मुलाला दीर्घायुष्य, चांगलं शिक्षण, चांगले आरोग्य देऊन याचा सांभाळ कर.ङ्घ उपस्थितांना गोडधोड खायला ावे. मात्र आहेर कुणाचाही घेऊ नये. या पध्दतीने वाढदिवस साजरा करावा.
टीप:

  • आजकालच्या वाढदिवशी मेणबत्त्या लावून त्या मुद्दाम विझवितात. हे अशुभ आहे.
  • केक करतात व त्यावर सुरी फिरवतात. अन्न शस्त्राने कापणे हे सुध्दा अशुभ. म्हणून या दोन्ही गोष्टी टाळून वरील पध्दतीने वाढदिवस साजरा करावा.

४ टिप्पण्या: