प्रधान सेवा केंद्र, श्री क्षेत्र दिंडोरी
महाराजांनी इ. स. १८७८ साली अक्कलकोटला लौकिकदृष्रटया समाधी घेवून अवतार संपवला असे भासत असले तरी ते आजही पूर्वीप्रमाणेच या पृथ्वीतलावर आहेत, ही तमाम मानवासाठी भाग्याची घटना आहे. महाराजांनी अक्कलकोटच्या २२ वर्षाच्या वास्तव्यात सर्वसामान्यांच्या इच्छा पूर्ती बरोबरच अनेक संत, सिध्द यांना धर्मकार्यासाठी विविध भागात पाठवले. कालांतराने मानवाच्या स्खलनशील स्वभावामुळे मूळ गुरूतत्वाचा विसर पडला व महाराजांच्या नावाखाली स्वतःचे स्तोम माजवणे व सर्वसामान्यांच्या श्रध्देचा गैरफायदा घेऊन पैसे कमविणे हा धंदा सुरू झाला. यामुळे बहुसंख्य समाज हा धर्माविषयी उदासीन व मूळ वैदिक तत्वज्ञानापासून वंचित झाला. यामुळे कलियुगाचे चालक, मालक, पालक व संचालक असणार्या दत्तमहाराज म्हणजेच स्वामी महाराजांनी मूळ गुरूप्रणित तत्वज्ञान शाश्वत स्वरूपात सर्व मानवासाठी उपलब्ध व्हावे म्हणून ब्रम्हीभूत पिठले महाराजांचे (इ.स. १८७८ - १९७४) गुरूपद घेऊन त्यांच्याकडून दीर्घ काळ हिमालय, प्रदीर्घ काळ त्र्यंबकेश्वर व नासिक येथे विविध उपासना, तपश्चर्या करून घेतल्या व पुढील कार्य नियोजनासाठी आज्ञा दिली.
ब्रम्हीभूत पिठले महाराजांनी तेजोनिधी सदगुरू मोरेदादा (इ.स. १९२२ - १९८८) यांचे गुरूपद घेऊन स्वामी महाराजांच्या वैश्विक धर्मकार्यासाठी संपूर्ण तयारी करून घेतली. सदगुरू मोरेदादांनी मूळ गुरूप्रणित तत्वज्ञान काळानुरूप आवश्यक ते बदल करून सर्वसामान्यापर्यंत पोहचवले ते म्हणजेच दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्ग होय. गुरूमाऊली प.पू. आण्णासाहेब मोरे यांच्या प्रभावी मार्गदर्शनाखाली दिंडोरी प्रणित सेवा कार्याची व्याप्ती दिवसेंदिवस वृध्दिंगत होत आहे. आज प.पु. गुरूमाऊलाइच्या रूपाने महाराजच कार्यरत आहेत. अशा प्रकारे तेजतत्त्वाची मूळ प्रेरणा लाभलेला श्री स्वामी समर्थ सेवामार्ग तेजातुन तेजाकडेच वाटचाल करत आहे.
श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र दिंडोरी प्रणित या नावाने कार्यरत असनारया संस्था ह्या जनहित, राष्ट्रहित, देशहित विज्ञानाला सामोरे जाउन अखंड परंपरा लाभलेल्या विविध पणे कार्य करीत आहे. श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग हा भक्ती , ज्ञान , वैराग्य नाम, जप, टाप, यज्ञ सेवा यांच्या अनुशागाने कार्य करीत आहे. मानवास मानव धर्म व मानवी समस्या या बाबींवर मार्गदर्शन हितगुज करून समस्या सोडवतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा