संख्याशास्त्र
संख्याशास्त्रालाच अंकशास्त्र असेही म्हणतात. संख्याशास्त्र हे ज्योतिषशास्त्रा प्रमाणेच मानवी जीवनाच्या भूत, भविष्य, वर्तमान याचा शोध घेणारे एक विश्वसनीय शास्त्र आहे. कुंडलीशास्त्राप्रमाणेच शुन्यातुन निघून पुन्हा शुन्यात विलिन होणार्या या विश्वाच्या वर्तुळाचे बारा भाग करून हे संख्याशास्त्र तयार झाले आहे. या शास्त्रामध्ये जन्मतारखेची संपूर्ण बेरीज करून त्यावरून व्यक्तीचा भाग्यांक व मुल्यांक काढून त्यावरून त्या व्यक्तीचे मित्र क्रमांक, शत्रु क्रमांक, शुभवार, भाग्य महिना, भाग्यरत्न संबंधित राशी, व्यक्तीचा स्वभाव, संभाव्य आजार, इ.माहिती मिळते. संख्याशास्त्रावरून व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तीमहत्त्व, गुण-दोष, मर्यादा, जीवनातील धोके, जीवनातील प्रगतीचे मार्ग इ.ची ओळख होते. व त्या अनुषंगाने योग्य ती सावधानता राखून स्वभाव बदलण्याचे प्रयत्न होवू शकतात. ईश्वरी सेवेमुळे त्यावर मात करता येवू शकते.
भाग्यांक व मुल्यांक काढण्याची पद्धत :- भाग्यांक व मुल्यांक काढताना संबंधित व्यक्तींची खरी जन्मतारीख घेऊन तिची पुढील प्रमाणे बेरीज करतात. उदा. समजा व्यक्तीचा जन्म हा ०६/०४/१९३५ आहे तर प्रथम त्या जन्म दिनांकाची एकांक बेरीज करावी. ६+४ १ ९ ३ ५ =२८ परत २ ८ =१० परत १ ०= १ ह्या ठिकाणी व्यक्तीचा जन्म दिनांक म्हणजे ०६ ह्याला मुल्यांक व संपूर्ण बेरजेच्या एकांकाला म्हणजे १ ह्या अंकाला भाग्यांक म्हणतात. १ ते ९ भाग्यांक विषयीक विशेष माहिती देणारा ग्रंथ ज्ञानदान भाग १ व ४ या ग्रंथ.
भाग्यक्रमांक - १ शासक ग्रह रवि (रवि आत्म्याचा पितृकारक आहे.) मित्र क्रमांक ५ व ६, शत्रु क्रमांक ३, ७ व ९ भाग्य तारखा १, १०, १९, २८ ( या दिवशी रविवार आल्यास शुभकारक). भाग्य महिना- जानेवारी व ऑक्टोबर, भाग्य रंग- सुवर्ण, भाग्य रत्न- माणिक, संभाव्य आजार- उजवा डोळा, हृदय विकार, रक्तदाब, पित्त विकार, डोके दुःखी, मुरलेला ताप, गुडघेदुखी, मुत्रपिंड आजार इ. भाग्यांक एक असणार्या व्यक्ती स्वाभिमानी, सत्यवादी, धीट, विश्र्वासू, प्रेमळ, दयाळू, करारीबाणा, भावनाशील, भागीदारीत अपयश, अग्री-विज, बंदूकीपासून धोका, महत्त्वाची वर्षे- १, १०, १९, २८, ३७, ४६, ५५, ६४, ७३, ८२, ९१ जीवनकाळ - २० ते २९ सामान्य, ३० ते ३९ फायाचे, प्रगतीचे, प्रसिद्धीचे, ४० ते ४९ त्रासाचे, असमाधानकारक, ५० ते ५९ सर्वोकृष्ट, संसारी जीवन, प्रगती, सन्मान, स्थावर लाभ. वय वर्षे ९, १२, ३१, ४०, ६०, ८२ आणि बाणी वर्षे.
भाग्यक्रमांक - २ शासक ग्रह- चंद्र, मित्र संख्या ५ व ८ भाग्य वार- सोमवार. भाग्य मास फेब्रुवारी आणि नोव्हेंबर. भाग्य रंग- पांढरा. भाग्य रत्न मोती. महत्त्वाची वर्षे २, ११, २०, २९, ३८, ४७, ५६, ६५, ७४, ८३. जीवनकाल- २९ ते ३० साधारण, धावपळ काळ. ३० ते ३९ बरा, उन्नतीस सुरूवात. ४० ते ४९ सर्वोत्कृष्ट काळ. ५० ते ५९ आरोग्य सांभाळणे. चंद्र मनाचा कारक, तसेच मातेचा कारक आहे. हळव्या अंतःकरणाची व अती भावनाप्रधान व्यक्ती असते. कुटुंबात भांडणे होणे, अपयश मिळणे, नातेवाईक दुरावणे, मातृवियोग होणे, मानसिक त्रास होत रहाणे इ. चंद्राची स्थिती बिघडलेली असेल तर अशा व्यक्तिंना अमावस्या, पौर्णिमा व अष्टमी या तिथींना त्रास होतो. झपाटले जाणे, वेडसरपणा करणे, क्षणात भडकणे, चिडणे वगैरे बाधांचा त्रास जास्त दिसून येतो. सर्व सामान्य माणसे, कल्पक, घर-कुटुंब-माता यांच्या विषयी ओढ, भावनाशील जुळवून घ्यायचा स्वभाव, मातृप्रेमी, दयाळू, विश्र्वासू, सहनशील, त्यागी. धंदा भागीदारीत अगर नोकरी, उत्तम आयुष्य.
भाग्यक्रमांक - ३ (ज्यांच्या धनु अगर मीन राशी आहेत) शासक ग्रह- गुरू, मित्र संख्या ७, शत्रु संख्या १ व ५, भाग्य वार-गुरूवार, भाग्य मास-मार्च आणि डिेसेंबर, भाग्य रंग-पिवळा, भाग्य रत्न-पुष्कराज, भाग्य क्रमांक तीनचा स्वामी गुरू ग्रह आहे. अशा व्यक्तिचे एक पाऊल संसारात व दुसरे पाऊस परमार्थात असते. प्रापंचिक अनासक्ती नसते. परंतु सर्व सुखे संयमाने व मर्यादेने भोगावी म्हणून रूढी प्रमाणे विवाह संतती, पूजा अर्चा वगैरे होते. व्यक्ती शांत स्वभावाच्या काहीशा स्थुलपणा असलेल्या, वागण्या बोलण्यात भारदस्तपणा, नीतिमान, सज्जन आणि धार्मिकवृत्तीच्या असतात. मध्यम वयानंतर परिपक्व होतात. या व्यक्ती अहंकारी श्रेष्ठत्त्व पावलेली आणि अधिकारी असतात. संभाव्य आजार- मेदोवृद्धी होणे, यकृताचे विकार, गळवे होणे, रक्त संचय होणे. महत्त्वाची वर्षे-३, १२, २१, ३०, ३९, ४८, ५७, ६६, ७५ व ८४. जीवनकाल २० ते २६ सामान्य, २७ सुखदायक घटना. ३० ते ३८ उत्कृष्ट. ४० ते ४९ साधारण. ५० ते ५९ प्रगतीचा. १६, ३५, ४४, ७१ आणिबाणी वर्षे.
भाग्यक्रमांक - ४ शासक ग्रह- हर्षल, मित्र संख्या ७. शत्रू संख्या ६ व ८. भाग्य वार-शनिवार, भाग्य मास- एप्रिल, भाग्य रंग गर्द निळा, भाग्यरत्न अलेक्झांड्रा. चार या भाग्यसंख्येच्य व्यक्ती अगदी शोधक बुद्धिचे टिकाकार असतात. हर्षल हा ग्रह रूढींना धक्का देणारा वैज्ञानिक ग्रह आहे. एककल्ली, लहरीवृत्ती, रूढीबाह्य वर्तन करणारे, नास्तिक, प्रापंचिक सुख कमी, संतती होण्यास अडथळे येतात. विवाह ही एक रूढी आहे व हर्षलास ती मंजूर नाही. सप्तमात हर्षल असल्यास वैवाहिक सुख कमीच मिळते. अपघात आणि अकस्मात पणाच्या बाबतीत हर्षल अत्यंत क्रूर फळे देतो. म्हणून त्या व्यक्तीने वाहन, सायकल, मोटारसायकल, चार चाकी वाहन वगैरे जपून चालवावे, त्यात जर त्या व्यक्तिच्या कंठावर तीळ असेल तर २-३ अपघात नक्कीच होतात.
संभाव्य आजार- झोपेचा त्रास, अती विचाराने डोळे गरगरणे, पाठीत चमका मारणे वगैरे. महत्त्वाची वर्षे- ४, १३, २२, ३१, ४०, ४९, ५८, ६७, ७६ आणि ८५. जीवनकाळ- २० ते २९ मदत मिळेल. २२, २४, २७, ३१, ३७ फायदेशीर, ४० ते ४९ उत्कृष्ठ. ५० ते ५९ साधारण. ६० ते ६९ भाग्याचा काळ.
भाग्यक्रमांक - ५ (ज्यांच्या मिथून व कन्या राशी आहेत.) शासक ग्रह- बुध. मित्र संख्या १ व ८, शत्रू संख्या २, ३ व ७. भाग्य वार, बुधवार. भाग्य मास- मे, भाग्य रंग हिरवा. भाग्य रत्न पाचू, बुध ग्रह बुद्धिमत्ता, विनोद बुद्धी यांचा कारक आहे. या व्यक्ती वार्यासारख्या चंचल मनोवृत्तीच्या असतात. कुणाशीही महत्र चटकन जमते. कुणाशी वैमनस्य करीत नाहीत. कोणत्याच गोष्टीची संपूर्ण माहिती नसते. बोलणे तरतरीत व हजरजबाबीपणाचे असते. व्यापारी लोक, वकील, ज्योतिषी, विनोदी लेखक, हिशोब तपासणीस, विक्रेते, एजंट, संपादक वगैरे मंडळी असतात. घाबरले की नीट बोलता येत नाही आणि चिडले की शुद्ध सुचत नाही. अशी माणसे फार गंभीर व पंडीत होऊ शकत नाहीत. संभाव्य आजार- नाराज होणे, भोवळ येणे, मेंदूचे विकार यांचा मेंदू जेवढा चलाख तेवढाच तो संशयी बनतो व म्हणून नको ते आजार आपणा होण्याची शक्यता व अशा शंकांनी ही मंडळी बेचैन झालेली असते. पचनक्रिया नीट नसते. रूधिराभिसरणावर परिणाम होतो.
महत्त्वाची वर्षे ५, १४, २३, ३२, ४१, ५०, ५९, ६८, ७७, ८६. जीवनकाळ- २० ते २९ कष्टदायक, १९, २३, २५, २६, २८ फायाची. ४० ते ४९ साधारण. ५० ते ५९ उत्तम प्रगती. ६० ते ६९ मध्यम, ७० ते ७९ उत्तम.
भाग्यक्रमांक - ६ (वृषभ आणि तुळ राशी) शासक ग्रह- शुक्र. मित्र संख्या १ व ८. शत्रू संख्या ४, ७ व ९. भाग्य वार- शुक्रवार. भाग्य मास जून. भाग्य रंग आकाशी निळा. भाग्य रत्न हिरा. भाग्य क्रमांक ६ च्या व्यक्ती आहेत त्या परिस्थितीत निटनेटक्या टापटीप राहणार्या असतात. शरीर चांगले असते. प्रकृती निकोप असते, वागण्यात रंगेलपणा असतो. तारूण्यसुलभ अवखळपणा आणि उत्साह असतो. अत्तरे, फुले, सौंदर्याची आवड असते. आवडणार्या गोष्टींचा मनमुराद आस्वाद घेणारे असतात. अपमान सहन न झाल्याने नुकसान करून घेतात. अशा व्यक्ती आपल्या आकर्षक व्यक्तीमत्त्वाने व आदरयुक्त वागण्याने मोठ्या हुद्द्याच्या जागेवर अधिकारी म्हणून काम करतात. समाजात निरूपद्रवी असतात. संघर्ष टाळतात. परमार्थाची विशेष आवड नसते. संभाव्य आजार, नाक, कान, घसा, लिव्हर चे आजार होतात. महत्त्वाची वर्षे ६, १५, २४, ३३, ४२, ५१, ६०, ६९, ७८ व ८७. जीवनकाळ २० ते २९ उत्कृष्ट, ३० ते ३९ मध्यम प्रगतीचा. ४० ते ४९ उत्कृष्ट, ५० ते ५९ असमाधानकारक. ६० ते ६९ उत्कृष्ट. १०, १९, २३, ३२, ३७, ५५, ७३, ७६ आणबाणीचा काळ.
भाग्यक्रमांक - ७ शासकग्रह- नेपच्यून (वरूण). मित्र संख्या ३, ९, २, ४ शत्रू संख्या १, ५, ६ व ७. भाग्यवार- गुरूवार, भाग्यमास- जुलै, भाग्यरंग- दुधिया, भाग्यरत्न- क्षीर स्फटीक. संभाव्य आजार- आतड्यांचे विकार, बद्धकोष्टता, महत्त्वाची वर्षे- ७, १६, २५, ३४, ४३, ५२, ६१, ७०, ७९, ८८ संपूर्ण गूढ सृष्टी नेपच्यूनच्या कारकत्त्वाखाली असल्याने अशा व्यक्तिंना अंतःस्फूर्तिने दूर अंतरावरील घटनांची जाणीव होते. ही मंडळी केवळ अपूर्ण राहिलेल्या इच्छापूर्ण करण्यासाठी जन्माला येतात. यांनी भावीकाळात घडणार्या घटनांची आगाऊ जाणीव होते. संशोधनाची, प्रवासाची आवड असते. इंजिनिअरींग, विमानविा, अंतराळसंशोधन वगैरे विषयात अधिकारपद मिळते.
भाग्यक्रमांक - ८ शासकग्रह- शनी. मित्र संख्या ५ व ६, शत्रू संख्या २, ४, ७. भाग्यवार-शनिवार, भाग्यमास- ऑगस्ट, भाग्यरंग- काळा, भाग्यरत्न-निलम. न संपणार्या दुःखामुळे ऐहिक आसक्ती संपुष्टात येते व आध्यात्मिक प्रगतीची वाटचाल सुरू होते. जीवनातील मायावी फसव्या गोष्टी शनी स्पष्ट करून समोर मांडतो. पुढे त्या व्यक्तिची आध्यात्मिक उन्नती निश्चितच होते. परंतु तो पर्यंत प्रपंचात दारूण दुःखे सहन करावी लागतात. सर्व महत्त्वाकांक्षा उध्वस्त झालेल्या असतात. शनी कर्तव्यकठोर आहे, त्याला अहंकार आवडत नाही.
संभाव्य आजार- डोकेदुखी, रक्तदाब, पाय, पोटर्या, चवडे दुखणे, पायाला वारंवार ठेचा लागणे, बोटे फुटणे. महत्त्वाची वर्षे ८, १७, २६, ३५, ४४, ५३, ६२, ७१, ८०, ८९. जीवनकाळ २० ते २९ धांत नोकरीत सामान्य काळ, ३० ते ३९ प्रगतीचे, ४० ते ४९ उत्तम प्रगतीचे, ५० ते ५९ उत्कृष्ट प्रगतीचे, ६० ते ६९ सामान्य, ७० ते ७९ फायाचे. २३, २६, ३२, ४१, ५०, ५३, ५५, ७७ फायाची. २, ११, १५, २०, २७, ३३, ४९, ५१, ५४, ६९ आणीबाणीची.
भाग्यक्रमांक - ९ (मेष, वृश्चिक राशी) शासक ग्रह- मंगळ, मित्र संख्या-७, शत्रू संख्या १ व ६. भाग्यवार- मंगळवार . भाग्यमास- सप्टेंबर, भाग्यरंग- रक्तवर्ण. भाग्यरत्न-पोवळे. मंगळ हा शक्तीचाकारक आहे. व्यक्ती क्रांतिकारी असते. तडफदारपणा जास्त निदर्शनास येतो.
विचारसरणी योद्ध्याची असते. अशा व्यक्ती अधिकार, हुकूमत गाजविणार्या असतात. मैदानी खेळांची आवड असते, उताविळपणा जास्त असतो. वृत्ती धरसोड असते, दूरदृष्टी कमी असते. पोलीस, मिलिटरी किंवा तत्सम खात्यांत नोकरी करावी लागते. शल्यविशारद, इंजिनिअर्स, युनियन लिडर, गुप्तहेर, शेतकरी आणि स्थावर इस्टेटीचे मालक असतात. संभाव्य आजार- उष्णतेचे विकार, गळवे, चट्टे, भाजणे, रक्तदाब वाढणे. महत्त्वाची वर्षे ९, १८, २७, ३६, ४५, ५४, ६३, ७२ व ८१.
Shri swami samarth ✨
उत्तर द्याहटवा